मुंबई | देशात मोगलाई आहे का?, असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेला भाजप नेेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवारांना महाराष्ट्र म्हणायचं होतं. चुकून ते देश म्हणाले हेराफेरी करुन पद मिळवल्यावर असं होत असल्याच म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. या संदर्भात निलेश राणेंनी ट्विट केलं आहे.
अजित पवार परवा भाषणात कुठंतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’, असं म्हणाले. यावर याला चिंधी बाजार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राच्या हिताचं काहीतरी बोला. असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, निलेश राणेंनी केलेल्या टीकेवर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
अजित पवारांना महाराष्ट्र सरकार म्हणायचं होत चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असं होतं. परवा भाषणात कुठेतरी ‘मी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही’ म्हणाले, ह्याला चिंन्दी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला. https://t.co/OXDedtAWi7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 8, 2021
थोडक्यात बातम्या-
पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव
गेहना वशिष्ठ अश्लील व्हिडीओ रॅकेटप्रकरणी मोठा खुलासा, बड्या अभिनेत्रीचा नवरा…
“…त्यावेळी गुलाम नबींना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, मात्र…”; पवारांनी सांगितला ‘तो’ खास किस्सा
अश्रुजीवी!!! काॅंग्रेस नेत्याविषयी बोलताना पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर
‘त्या’ आत्महत्या केलेल्या तरुणीचे मंत्र्यासोबत प्रेमसंबंध?; पोलीस काय म्हणाले???