बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर लोकांनी शरद पवारांना डोक्यावर घेतलं असतं’, निलेश राणेंची बोचरी टीका

मुंबई | राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगत असताना भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आणखी एकदा निशाणा साधला आहे. एवढ्या वर्षात शरद पवारांनी काही केलं असतं तर लोकांनी आता त्यांना डोक्यावर घेतलं असतं, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

4 वेळा मुख्यंमंत्री, जवळपास 20 वर्ष केंद्रात मंत्री, पन्नास वर्ष आमदार किंवा खासदार. अनेक संस्थांवर अध्यक्ष तरी शरद पवार बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वगैरे वर भाष्य करतात, असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

मला प्रश्न पडतो की इतके वर्ष तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही काहीतरी केलं असतं तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं, असं म्हणत निलेश राणेंनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. निलेश राणेंनी ट्विट करत शरद पवारांसह शिवसेनेवरही (Shivsena) टीका केली आहे.

दरम्यान, नवनीत राणांची MRI मध्ये तपासणी होताना त्यांचा बाहेरून फोटो कोणी काढला हे शोधण्यासाठी शिवसेनेचे नेते मंडळी स्वत: लीलावती हॉस्पिटलला गेले. हा प्रश्न महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा व गंभीर झाला आहे, असा टोला निलेश राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार भाजपला घाबरतात, एकत्र लढूनही त्यांची फ्या फ्या होते”

“शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आणि हिंदुत्वाशी संबंधही राहिला नाही”

प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन

‘…तर आज राज ठाकरे सुद्धा मुसलमान असते’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता ‘या’ गोष्टीसाठीही मोजावे लागणार पैसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More