बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालीये”

मुंबई | महाविकास आघाडीच्या (MVA Government) माध्यमातून सत्तेची सुत्र हातात घेण्यात शिवसेना (Shivsena) यशस्वी ठरली आहे. पण अशात शिवसेनेत पक्षांतर्गत कलह पेटला आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनामध्ये आपल्याच पक्षातील नेत्याविरूद्ध खदखद भरली आहे. शिवसेनेचे नेते रामदार कदम (Shivsena Leader Ramdas Kadam) यांच्या विस्फोट करणाऱ्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे.

रामदार कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परिणामी सर्व स्तरातून शिवसेनेवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी रामदास कदम प्रकरणावर आपल्या खास शैलीत भाष्य केलं आहे.

रामदास कदम यांची अवस्था ही ना घर का ना घाट का अशी झाली आहे. रामदास कदम यांनी नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचं काम केलं कारण त्यांना मातोश्रीकडून बक्षिस हवं होतं. त्यांना नारायण राणे यांच्यावर टीका करण्यासाठीच विरोधी पक्षनेता बनवण्यात आलं होतं. आता त्यांची गरज संपली आहे म्हणून त्यांची ही अवस्था झाली आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्याचे माजी पर्यटन मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली आहे. परिणामी शिवेसेनेत भुकंप झाला आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकेनंतर शिवसेनेतील अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत.

थोडक्यात बातम्या 

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

“अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, त्यांना तर…”

‘शिवसेना पक्षप्रमुख कोण आहेत अनिल परब की उद्धव ठाकरे?’; रामदास कदम आक्रमक

“लग्नाला उशीर केल्यास मुली पाॅर्न पाहत बसतील, त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More