‘…असे पवार साहेब बघवत नाहीत’; निलेश राणेंचा शरद पवारांना टोला

पुणे | त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयात भाजपची सत्ता आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी देशात बदलाचा मूड आहे. बदलाचं वारं वाहत आहे, असं शरद पवार म्हणाले.

आंध्र प्रदेशातही भाजप नाही. त्यानंतर पंजाबमध्ये भाजप नाही. दिल्लीत भाजप नाही. हिमाचल प्रदेशातही नाही भाजप नाही. ममताच्या राज्यात भाजप नाही. हे सर्व चित्रं जे दिसतं या देशात बदलाचं वारं दिसतं. त्याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीत पाहायाला मिळेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांनी कोणत्या कोणत्या राज्यात भाजपची सत्ता नाही यादी दिली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी ट्विट करत शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. याला म्हणतात फुकट वेळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझी विनंती आहे पवार साहेबांना काही तरी काम द्या कारण काम नसलेले पवार साहेब बघवत नाही, असं निलेश राणे म्हणालेत. हातावर बोटं मोजण्या इतकी पण यादी नसेल पण काय काय करावं लागतंय वेळ मारायला, असं निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-