मुंबई | कोरोनाच्या कठीण काळात घरमालकांनी भाड्यासाठी तगादा लावू नये. यासाठी किमान तीन महिने भाडेकरुंना वेळ द्यावा, अशा सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या आहेत. त्यामुळे भाड्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजप नेते निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे,
सरकारने तीन महिन्याने घरभाडे पुढे ढकलले पण तीन महिन्यानंतर तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून???, असा सवाल निलेश यांनी सरकारला विचारला आहे. तीन महिन्यांचं घरभाडे नुसते पुढे ढकलून चालणार नाही तर घरभाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किंवा माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “तीन महिन्याने घरभाडे पुढे ढकलले सरकारने पण तीन महिन्यानंतर तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून??? नुसते पुढे ढकलून चालणार नाही, तीन महिन्याचे भाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किव्हा माफ करावे”. त्यांनी हे ट्विट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सीएमओ महाराष्ट्रला टॅग केले आहे.
दरम्यान, पुढचा काळ कठीण आहे. संकटाच्या काळात गरिबांच्या मागे उभं राहणं आवश्यक आहे. महिनाभर घरात आहे, राहायचं कसं? खायचं का?, हा गोरगरिबांना प्रश्न आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने भाडेकरुंना दिलासा दिला, तर बरं होईल. तीन महिने भाडे पुढे ढकलावं, अशा सूचना जितेंद्र आव्हाडांनी घरमालकांना केलं आहे.
तीन महिन्याने घरभाडे पुढे ढकलले सरकारने पण तीन महिन्यानंतर तीन महिन्याचे पैसे माणसाने आणायचे कुठून??? नुसते पुढे ढकलून चालणार नाही, तीन महिन्याचे भाडे राज्य सरकारने स्वतः भरावे किव्हा माफ करावे. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/MmkPbbzfeG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 18, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’; मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक
आम्ही औषधं पाठवतोय अन् पाकिस्तान अतिरेकी- लष्करप्रमुख नरवणे
महत्वाच्या बातम्या-
संजय राऊत यांच्या अग्रलेखाची इतिहासात नोंद होईल- काँग्रेस
20 तारखेपासून मोजके उद्योग-व्यवसाय सुरू होणार मात्र अटी शर्थी पाळाव्या लागणार- अजित पवार
Comments are closed.