महाराष्ट्र मुंबई

‘महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता’; निलेश साबळेने मागितली माफी

मुंबई | चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. यावरूनच झी मराठी आणि अभिनेता निलेश साबळे यांनी माफी मागितली आहे.

स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून…घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व असल्याचं निलेश साबळेने म्हटलंय.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी राजे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लोकप्रियतेची हवा डोक्यात शिरली की माणूस विक्षिप्त वागतो, अशी टीका केली होती.

दरम्यान, आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. निलेश साबळे तसंच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केली होती.

Nilesh Sable

zee marathi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 13, 2020

ट्रेंडिंग बातम्या-

भारतात 11 रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा

राष्ट्रवादी सोडल्यापासून उदयनराजेंच्या संपत्तीत इतकी घट!

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवा”

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली!

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या