Top News विधानसभा निवडणूक 2019

”सभेत कुत्रा घुसला अन् पवार म्हणाले, शिवसेनेची लोकं आली का?”

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी या मुलाखतीवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

सभेत कुत्रा घुसला अन् शरद पवार म्हणाले, शिवसेनेची लोकं आली का?, असा मजकूर असलेली पोस्ट त्यांनी ट्विट केली आहे. शरद पवार साहेबांची मुलाखत बघितली. खूप शिकण्यासारखं आहे साहेबांकडून, असं कॅपशन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.

शरद पवार यांच्या प्रचार सभेत कुत्रा घुसला होता. यावेळी लोकांसमोर बोलताना पवारांनी शिवसैनिकांना कुत्र्याची उपमा दिली होती. याचा संदर्भ देत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत कडवट टीका केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राणे बंधू अ‌ॅक्टिव मोडमध्ये आले आहेत. त्यांनी विविध मुद्यांवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरु केले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या