बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

नवी दिल्ली | कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या वारसांपैकी किती लोकांनी भरपाईसाठी अर्ज केले तसेच किती लोकांना भरपाई देण्यात आली यासंदर्भात महाराष्ट्रासोबतच 9 राज्यांनी केंद्र सरकारला माहिती दिली नाही. संपुर्ण देशभरात कोरोनामुळे मृत पावलेल्या वारसदारांना मदत मिळण्याचं प्रमाण अत्यल्प असल्याने सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारला माहिती न देणाऱ्या राज्यांमध्ये  महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, झारखंड, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. तसेच केंद्र शासित प्रदेशांमध्ये जम्मू-काश्मिर आणि लडाखचा समावेश आहे.

कोरोनामुळे मृत पावलेल्या वारसांना मदत करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून योजनेची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असं सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्या.एम. आर. शहा, न्या. बी. एन. नागरत्न यांच्या खंडपीठाने सर्व राज्यांना आदेश दिले आहेत.

दरम्यान, या योजनेनुसार कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची नुकसान भरपाई देण्यात येते. प्रत्येक राज्यात कोरोनामुळे किती मृत्यु झाले, त्यांच्यापैकी किती जणांच्या वारसदारांना भरपाई देण्यात आली याचा अहवाल राज्यांनी सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच भरपाईसाठी वारसदाराने दावा करण्याची पद्धत सोपी हवी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! गोव्यात काॅंग्रेसचा भाजप आणि टीएमसीला जोर का झटका

सरकारची मोठी घोषणा; मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

‘केवळ नाव राष्ट्रवादी, काम मात्र कुटुंबवादी’; शिवसेना नेत्याची राष्ट्रवादीवर गंभीर टीका

“आधी आमच्या शेतातील वीज खांबाचं भाडं द्या अन् नंतरच वीज कनेक्शन कापा”

“शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये आहेत, ते भाजप सोडून गेले नाहीत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More