बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ फलटण बंद

फलटण | फडणवीस सरकारने निरा देवघर आणि गुंजवणी धरणातून बारामतीकडे जाणारं पाणी बंद केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारने तो निर्णय रद्द करुन, निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

नीरेचं पाणी बारामतीला वळवण्याच्या निर्णयाने फलटणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी फलटणकरांनी आज फलटण बंदची हाक दिली आहे. पाणी समितीने आज निषेध मोर्चा काढून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

सरकारने हा निर्णय रद्द करावा, अशा मागणीचं निवेदन पाणी समितीने फलटण तहसीलदारांना दिलं आहे. फलटण, माळशिरस आणि खंडाळ्याला पाणी मिळण्यासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी शहरातून निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता.

निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे, शिल्लक राहणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री दत्ता  दिली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कुणालाही नको असलेली खाती मी मागून घेतली- आदित्य ठाकरे

…त्यांनी आपले आक्रमण अजून पाहिलेले नाही- राधाकृष्ण विखे पाटील

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही- उदयनराजे भोसले

“ट्रम्पच्या बाजुला सनी लिओनी उभी राहिली तर 1 कोटी लोक नक्की जमा होतील”

केवळ शिवसेनेने नाही तर काँग्रेसनेही CAA समजून घ्यावा; काँग्रेस खासदाराचा घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More