मुंबई | निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना आज पहाटे 5.30 वाजता तिहार तुरुंगामध्ये फासावर लटकवण्यात आलं. रनेटवर अनेकांनी निर्भयाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही ट्विटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत ट्विट केलं आहे.
बलात्कारासारखा भयंकर गुन्हा करणाऱ्याचा विचारही कोणाच्या मनात येऊन नये अशी भिती निर्माण करायची असल्यास कायदे कठोर करणं गरजेचं आहे. कठोर शिक्षा, जलद गतीने होणारा न्यायनिवाडा हेच असे गुन्हे थांबवण्याचा मार्ग आहे, असं रितेशने म्हटलं आहे.
माझ्या सद्भावना निर्भयाचे पालक, मित्र आणि नातेवाईकांबरोबर आहेत. बराच वेल वाट पहावी लागली पण अखेर न्याय मिळाला, असं रितेशने आपपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, डिसेंबर 2012 मध्ये घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. 7 वर्षे, 3 महिने आणि 3 दिवस निर्भयाला न्यायाची वाट पहावी लागली.
#JusticeForNirbhaya My thoughts and prayers are with the parents, friends & loved ones of Nirbhaya. The wait has been long but the justice has been served.
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 20, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“निर्भयाची आई ही माझी ओळख अभिमानास्पद, आज ती असती तर…”
‘निर्भया’ला अखेर न्याय; सूर्योदयापूर्वी चारही दोषींना फाशी
महत्वाच्या बातम्या-
अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन
कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी
Comments are closed.