देश

प्रदुषणाने आयुष्य कमी होतंय, मग फाशीची गरज काय? निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीचा सवाल!

नवी दिल्ली | दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी धोक्याच्या स्तरावर गेली आहे. यामुळे आधीच आयुष्य अत्यंत कमीकमी होत आहे. अशा स्थितीत फाशीची गरज काय?, असं निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी अक्षय कुमार सिंह याने म्हटलं आहे.

हवा प्रदुषणामुळे दिल्लीची अवस्था गॅस चेंबरसारखी झाली आहे. इतकंच नाही तर दिल्लीतील पाण्यात देखील विष मिसळलं जात आहे. हे वास्तव सरकारने नुकत्याच संसदेत सादर केलेल्या अहवालातून सिध्द झालं आहे. दिल्लीत हवा आणि पाण्याबाबत काय घडतं आहे याविषयी सर्वांनाच कल्पना आहे, असं आरोपीने म्हटलं आहे.

अक्षय कुमार सिंह 2012 मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी सिध्द झाला आहे. न्यायालयाने देखील हा निघृण गुन्हा असल्याचं म्हणत आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती.

बिहार मधील बक्सर कारागृहाला या आठवड्यात दोर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. काही प्रसारमाध्यमांच्या अंदाजानुसार या महिना अखेरीस शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या