Top News

‘निर्भया’ला अखेर न्याय; सूर्योदयापूर्वी चारही दोषींना फाशी

नवी दिल्ली | दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना आज पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आलं.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केलं. तिहार जेलमधील तीन क्रमांकाच्या तुरुंगात चौघांना फाशी देण्यात आली.

फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. यावेळी तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, निर्भयाच्या आई आशादेवी यांनीही समाधानाची भावना व्यक्त केली.

ट्रेंडिंग बातम्या-

रामदेव बाबा टाकणार तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; केली कंपनीची स्थापना

मोदींनी बांधलेला पुतळा बंद मात्र नेहरूंनी उभारलेली रूग्णालये 24 तास सुरू- आव्हाड

महत्वाच्या बातम्या-

अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन

कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी

संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर आहे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या