नवी दिल्ली | दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेली निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. फाशी दिल्यानंतर निर्भयाची आई ज्या आशादेवी सोसायटीत राहते, तिकडे गर्दी झाली. यानंतर आशादेवी त्या बिल्डिंगच्या खाली आल्या.
निर्भयाला मी वाचवू शकले नाही याचं मला वाईट वाटतं. मात्र तिला न्याय मिळाला याचं मला समाधान आहे. इतकंच नाही तर निर्भयाची आई ही मला मिळालेली ओळख अभिमानास्पद आहे. आज निर्भया असती तर तिला जशी मिठी मारली असती अगदी तशीच मिठी मी तिच्या फोटोला मारली, अशी भावूक प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
मी मुलीचा फोटो गळ्याला लावला आणि म्हटलं, बेटा तुला आज न्याय मिळाला, मला माझ्या मुलीवर गर्व आहे. आज जर ती या जगात राहिली असती, तर मी एका डॉक्टरची आई म्हटली गेली असती, असं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील मुलींसाठी माझा संघर्ष सुरूच असणार आहे. मी पुढेही हा लढा सुरू ठेवणार आहे, आजपासून देशातील मुली स्वत:ला सुरक्षित वातावरणात आहोत असं समजतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
रामदेव बाबा टाकणार तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल; केली कंपनीची स्थापना
मोदींनी बांधलेला पुतळा बंद मात्र नेहरूंनी उभारलेली रूग्णालये 24 तास सुरू- आव्हाड
महत्वाच्या बातम्या-
अन्नदात्यासाठी अन्नत्याग… साऱ्या महाराष्ट्रात झाले अन्नत्याग आंदोलन
कंपन्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार कापू नये- नरेंद्र मोदी
Comments are closed.