नवी दिल्ली | टोकियो ऑल्मपिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली आहे. फिनलँडमध्ये सुरू असणाऱ्या कुओर्तने गेम्समध्ये नीरज चोप्राने 86.89 मी. लांब भाला फेक करत गोल्ड मेडलवर नाव कोरले आहे.
नीरज चोप्राने पहिल्याच फेरीत 86.89 इतक्या अंतरावर भाला फेकला. बाकी दोन्ही डावांना फाऊल म्हणून संबोधले जेणेकरुन छोटी धावसंख्या येऊ नये. थ्रो फेकताना पाय घसरला पायाला दुखापत झाली तरी न थांबता तो पुन्हा उभा राहिला आणि खेळला.
काही दिवसापूर्वीच नीरज चोप्राने फिनलँडमध्येच राष्ट्रीय विक्रम केला होता. नीरज चोप्राने येथे पावो नूरमी गेम्समध्ये 89.30 मी. भाला फेक करत रौप्य पदक जिंकले. या खेळात त्याच्यासोबत अँडरपीटरसन होता. या स्पर्धेत ऑलिव्हर हेलांडेरने 89.33 मी. लांब भाला फेक करत सुवर्ण पदक कमावले.
दरम्यान, 10 महिन्यांच्या विश्रांतीनंतर नीरज चोप्रा या खेळासाठी उतरला होता. केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकुर यांनी नीरज चोप्राच्या खेळाचा व्हिडिओ ट्विट करत लिहलयं की त्याला पुन्हा सोनं मिळालं. त्यांने करून दाखवल शाब्बास !! . या यशामुळे नीरज चोप्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.
थोडक्यात बातम्या
Monsoon Update| राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
एकनाथ खडसे आणि राम शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ
कोरोनाचं थैमान! 24 तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी समोर
विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक खुलासा
Comments are closed.