Top News

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का; या दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | काँग्रेसच्या निर्मला गावित आणि राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निर्मला गावीत आणि रश्मी बांगल यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

निर्मला गावीत यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर आमदार सदा सरवणकर यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश एक दिवस लांबणीवर पडला होता.

गेल्या 13 वर्षापासून शरद पवारांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो. त्यांचं व आमचं नातं एक नेता आणि कार्यकर्त्यांच्या पलिकडचं आहे, असं रश्मी बागल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जनतेला न्याय आणि सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं रश्मी बागल यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीतील आणखी एक नेता भाजपच्या गळाला???

“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या