Loading...

काँग्रेसला मोठा धक्का; निर्मला गावित यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

मुंबई |  काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

निर्मला गावित या काँग्रेलसा सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Loading...

निर्मला गावित विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देता वेळी शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.

दरम्यान, सेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीच्या निधनामुळे आज होणारा पक्षप्रवेश उद्या होणार असल्याचं कळतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-बायको लाडूशिवाय दुसरं काही खाऊच देत नाही; पतीची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव

-राष्ट्रवादीत जाणार का??? नारायण राणेंचं 4 शब्दांचं उत्तर अन् पवार वेटिंगवर…!

-वडिल 52 वर्षे काँग्रेस खासदार, मुलगी शिवबंधनात तर मुलगा भाजप वाटेवर!

Loading...

-होय… मला प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच फोन करून सांगितलं होतं; नांदगावकरांचा गौप्यस्फोट

-“आतापर्यंत मनसेचं खळखट्ट्याक पाहिलं… आता शांततेची ताकद दाखवू”

Loading...