देश

नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

Loading...

नवी दिल्ली | सध्याच्या परिस्थितीत बॅंकिंग व्यवहार सुरळीत चालणं आवश्‍यक झालं आहे. त्याचबरोबर नागरिकांना पैसे उपलब्ध होणे गरजेचं आहे. त्यामुळे लोकांना पैशाची उणिव भासणार नाही. यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

सर्व बॅंकर्सना आम्ही या काळात सर्व सेवा व्यवस्थित चालू ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाताना अडचणी येत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपण यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने गरीब लोकांना बॅंकांमध्ये काही रक्कम टाकण्याचे जाहीर केले आहे. पुढील आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या काळात बॅंकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशभरात सध्या एक लाख 5 हजार 988 शाखांमध्ये काम चालू आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी काम सुरू झाल्यानंतर बॅंक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची गर्दी होणार नाही यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात असं त्यांनी सांगितलं.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन

देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत

महत्वाच्या बातम्या-

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती; महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्लाॉ

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ

सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या