बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्थमंत्र्यांचं 162 मिनिटांचं भाषण… गुंतवणूकदारांना 4 लाख कोटी रूपयांचा झटका!

नवी दिल्ली |  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. मात्र, या अर्थसंकल्पाने अनेकांची निराशा केल्याचं चित्र आहे. कारण शेअर बाजारात जोरदार घसरण झाली असून सेन्सेक्स 988 अंकांनी घसरून 39,735.53 च्या पातळीवर बंद झाला आहे.

निफ्टी 318 अंकांनी घसरली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या 4 लाख कोटी रूपयांना झटका बसला आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाचे पडसाद शेअर बाजारात उमटल्याचं दिसत आहे. बाजारात गेल्या 10 अर्थसंकल्पातील यावेळेस सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे.

अर्थमंत्र्यांनी इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले. त्याबरोबर कंपनीवरचा DDT (dividend distribution tax) देखील रद्द केला. गुंतवणूकदारांना LTCG आणि STT वर अपेक्षा होत्या. परंतू सरकारने याच्या घोषणा न केल्याने बाजाराचा मूड बदलला.

दरम्यान, मोदी सरकारच्या पाठीमागच्या 6 अर्थसंकल्पांपैकी 4 अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात घसरण झाली होती. तरीदेखील गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात सेन्सेक्स 0.6% टक्के वाढला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारचा नवा टॅक्स स्लॅब; तुमच्या इतक्या वार्षिक उत्पन्नावर लागणार इतका टॅक्स!

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारवर स्तुतीसुमने

महत्वाच्या बातम्या-

‘या देशात फक्त हिंदूंची चालणार’; शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचं वक्तव्य

शेतीसाठी निधीची तरतूद अत्यंत कमी; अर्थसंकल्पावरुन राजू शेट्टींची टीका

…म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पूर्ण अर्थसंकल्प वाचताच आला नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More