बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करणार

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-21 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करणार आहे. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरू होणार आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, 2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

नरेंद्र मोदी माझे पंतप्रधान; केजरीवालांनी पाकिस्तानच्या मंत्र्याला सुनावलं

भाजपनं सुरु केलेल्या योजना बंद करु नका; रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

महत्वाच्या बातम्या- 

केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

“मुख्यमंत्रीपद झेपत नसेल तर उद्धव ठाकरेंनी खुर्ची सोडावी”

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More