नवी दिल्ली | पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यापासून बँकांमधील ग्राहकांच्या ठेवींच्या सुरक्षिततेबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. हा वाद सुरू असताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली.
बँक खात्यात जमा असलेल्या रकमेवर विमा हमीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार बँक बुडाली तर केंद्र सरकार तुम्हाला 5 लाख रूपये देणार आहे.
सध्या एखादी बँक बुडाली, तर सरकार तिच्या ठेवीदारांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये देते. पण ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. बँकांमध्ये जमा झालेल्या रकमेवर पाच लाख रुपयांची विमा हमी दिली जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
दरम्यान, ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी चांगली यंत्रणा तयार केली जात असल्याचंही सीतारमण यांनी अर्थसंकल्पात म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी नव्या योजनांची नांदी
मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींसाठी अर्थसंकल्पात ‘इतक्या’ कोटींची तरतूद
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘नवी बाटली जुनी दारू’; काँग्रेसची टीका
मोदींच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
भारताचा हा गोलंदाज सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज- शोएब अख्तर
Comments are closed.