नवी दिल्ली | केंद्रातील सरकार आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करत आहे. केंद्रीय अर्थमत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला यश आल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.
सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धोरणावर आमचं सरकार पुढे जात आहे. भारत आज जगातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये आघाडीवर आहे. 2014 ते 2019 च्या दरम्यान मोदी सरकारच्या धोरणांमुळे 284 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आली ज्यामुळे व्यवसायात वाढ झाली, असं सीतारामन यांनी सांगितलं.
देशातील नागरिकांकडे रोजगार असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच हा अर्थसंकल्प त्यांचं उत्पन्न निश्चित करणारं आणि त्यांची क्रयशक्ती वाढवणारं असेल, असंही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं आहे.
60 लाख नवे करदाते जोडले, 40 कोटी रिटर्न, 105 ई बिलं तयार झाली. पंतप्रधानांनी गरिबांना थेट फायदा होईल अशा योजना आणल्या, असंही सीतारामन यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
“आशिष शेलारांना टिंगलटवाळीशिवाय काही काम उरलं नाही”
…म्हणून मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
“भारतात रेस्टॉरंट सुरु करण्यापेक्षा बंदुकीचं लायसन्स मिळवणं सोपं”
जगात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय मायदेशी
शहापूरच्या आदिवासी पाड्यातील झोपडीत शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद!
Comments are closed.