नवी दिल्ली | फोर्ब्सने नुकतीच जगातील सर्वाधिक प्रभावी असलेल्या 100 महिलांची नावे प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये देशातील अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा समावेश झाला आहे.
फोर्ब्सच्या सतराव्या वार्षिक पावर लिस्टमध्ये 30 देशांतील महिलांचा समावेश आहे. ज्या महिला 2020 मधील आव्हानांना ठामपणे सामोऱ्या गेल्या आणि ज्यांचे निर्णय इतरांसाठी आदर्श ठरले आहेत, अशा महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीमध्ये निर्मला सीतारामण या 41 व्या स्थानावर आहेत.
निर्मला सीतारामण यांच्यासोबत या यादीमध्ये अमेरिकेच्या निवडणुकीत नुकत्याच निवडून आलेल्या आणि लवकरच उपराष्ट्राध्य म्हणून शपथ घेणार असलेल्या कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ, एचसीएल एंटरप्राइजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडर मल्होत्रा यांचाही समावेश आहे.
दरम्यान, फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक प्रभावी 100 महिलांच्या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पहिल्या स्थानावर कायम आहेत.
थोडक्यात बातम्या-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर येणार वेबसिरीज
कृषी कायदे रद्द होणार की नाहीत यावर अमित शहांनी केला खुलासा; म्हणाले…
कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर- पंतप्रधान नरेंद्र मोदी
महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण