बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळा पैसा परत आणण्याबाबत मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन( Nirmala Sitaraman) या जम्मु काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध आर्थिक कामानां सुरूवात करण्यात आली. यावेळी निर्मला सितारामन यांनी देशाकडून कर्ज घेऊन फरार असणाऱ्यांना कठोर शब्दात सुनावले आहे. “देशातील बँकाना गंडा घालून पळून जाणाऱ्या सर्व कर्जबुडव्यांचा शोध घेतला जाईल आणि आपल्या देशाचा पैसा परत आणला जाईल”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “आपल्या बॅंकातून जो पैसा परदेशात गेला आहे तो परत आणण्यात येईल. ही फसवणूक करणारी मंडळी देशात आहेत की देशाबाहेर यामुळे फारसा फरक पडणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवाय आता बँकामधील गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. एखाद्याने कर्ज घेतले असेल आणि ते परत केले जात नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी जम्मू- काश्मीर (Jammu-Kashmir) विषयी बोलताना “जम्मू-काश्मीरला करण्यात येणाऱ्या अर्थपुरवठ्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्व ते उपाय आखले जातील”, असं आश्वासन दिलं आहे. तसेच केंद्र पुरस्कृत योजना आणि पंतप्रधान विकास योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारसोबत समन्वय ठेवला जात असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

निर्मला सितारामन 2 दिवस काश्मीर दौऱ्यावर होत्या. त्या आज जम्मुत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नांवर चर्चा केली. शिवाय देशात सध्या भारतात कर्ज घेऊन परदेशात लपून बसलेले कर्जबुडव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, यावरूनही त्यांनी “या कर्जबुडव्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

…म्हणून ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमनं मागितली नारायण राणेंची माफी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More