नवी दिल्ली | देशाच्या संसदेत सध्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. अशातच देशात द काश्मीर फाईल्सवरून राजकारण होतय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी काश्मीर प्रश्नावरून परत एकदा काॅंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या युद्धानंतर 1948 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला होता. भारताची अंतर्गत बाब असणारा काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर नेण्याची गरज नव्हती, असंही सितारमण म्हणाल्या आहेत.
आजपर्यंत आपल्या शेजारचा देश पाकिस्तान भारताच्या या चुकीचा दुरूपयोग करत आहे. गरज नसताना पंडीत नेहरूंनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात का नेला, असा सवालही सितारमण यांनी काॅंग्रेसला विचारला आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरवर जेव्हाही संसदेत चर्चा होते पंडित नेहरूंच्या नावाचा उल्लेख करत भाजप काॅंग्रेसवर टीका करताना पाहायला मिळते.
महत्त्वाच्या बातम्या –
महात्मा गांधींबद्दल बोलताना बंडातात्यांची जीभ घसरली, म्हातारा उल्लेख करत म्हणाले…
“मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन”
“होय, आम्ही नेहरू-गांधी घराण्याचे गुलाम आहोत”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते दररोज आमच्यावर मिसाईल्स सोडतायेत”
तरूणांसाठी गुड न्यूज; परिक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी
Comments are closed.