देश

कोरोना लसीसंदर्भात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा!

नवी दिल्ली | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी बजेटच्या सुरुवातीलाच कोरोना लसीसंदर्भात तरतुदीची घोषणा केली आहे.

35 हजार कोटी रुपये लसीकरणासाठी या आर्थिक वर्षात राखून ठेवल्याचं निर्मला सीतारामन यांनी भाषणात सांगितलं. पण यासाठी कुणाला मोफत, कुणाला पैसे द्यावे लागणार याचा अद्याप उल्लेख नाही.

2021 च्या बजेटमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या काही कालावधीत आणि लॉकडाऊन दरम्यान सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

थोडक्यात बातम्या-

नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींची तरतूद- निर्मला सीतारामन

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ बदल

‘शरद पवारांवर टीका केल्याशिवाय आमचा पक्ष वाढूच शकत नाही’; चंद्रकांत पाटलांची कबुली

आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

“बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो, पण त्यांचा मुलगा चांगलाय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या