मुंबई | अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत पुलाच्या ढिगाऱ्याखालून 4 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे.
एलफिस्टनच्या दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलेलं नाही का?, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सर्व पुलांचे ऑडिट का केलं नाही?, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री पियुष गोयल मिलेटरीला बोलावून पुल बांधण्याची वक्तव्यं करतात. त्यांनी फक्त आहे त्यात लोकांना नीट सुविधा द्याव्यात, असंही निरूपम यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-काँग्रेसचा संजय निरूपम यांना धक्का; पदावरून उचलबांगडी?
-धक्कादायक!!! अंधेरीमध्ये पुलाचा मोठा भाग रेल्वे रुळांवर कोसळला
-30 लाखांचा चेक फडकवत भाजप नेता म्हणाला, ‘बोला आता तरी तिकीट देणार का’?
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू
-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!