बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात; श्रीवर्धन, अलिबागमध्ये तुफान पाऊस

रायगड |  श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 13 हजार 541 जणांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More