Top News

पुढील सहा तासांत चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार- हवामान विभाग

मुंबई | चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. पण पुढील सहा तासांमध्ये या वादळाची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.

वादळाचा परीघापैकी काही भाग अजूनही समुद्रावरच आहे. संपूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून किमान एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता 90-100 किलोमीटर प्रती तास ते 110 किलोमीटर प्रती तास इतकी आहे.

पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलववण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

‘कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’; उद्धव ठाकरेंसाठी केजरीवालांचं ट्विट

सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभं रहावं- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या