बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराला अटक केली होती. या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली होती. अशातच आता करण मेहराच्या परिवारावर अर्थातच अभिनेत्री निशा रावलच्या सासरकडच्या लोकांवर स्वतः निशाने तक्रार नोंदवली आहे. यामागे निशाचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे.

काही दिवसांपुर्वीच निशा मेहरा हिने करणवर इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे आरोप करत गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता निशा विरोधात सासरच्या लोकांनीच करणला भडकावल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. सासु, सासरे, अजय मेहरा आणि बेला मेहरा, दिर कुणाल मेहरा या तीन लोकांच्या नावाने निशाने तक्रार दाखल केली आहे. या लोकांनीच करणला भडकावले आणि त्यामुळे करणने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केल्याचं निशाने म्हटलं आहे.

निशा यावर गप्प बसली नसून करणच्या घरातील सदस्य अजय मेहरा, बेला मेहरा आणि कुणाल मेहरा या तिघांवरही तिने मारहाण आणि जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे आरोप लावले आहेत. तसेच बँक अकाउंटमधून करणने तब्बल एक कोटींपेक्षा अधिकची रक्कम काढल्याचे आरोपही निशाने करणवर केला आहे. त्यामुळे करणच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, करण मेहरा हा हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे तो विशेष गाजला. या मालिकेत तो मध्यवर्ती भूमिकेत होता. याशिवाय त्यानं हिंदी बिग बॉस स्पर्धेतही सहभाग घेतला होता.

थोडक्यात बातम्या- 

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबीलनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी तरुणी पडली भारतीय तरुणाच्या प्रेमात, देशात येण्यासाठी थेट मोदींकडे विनंती

 

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More