दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 5 लाखात ही भन्नाट कार!

Nissan Magnite Facelift Launch l निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेत मॅग्नाइट फेसलिफ्ट लाँच केली आहे. यापूर्वी Nissan Magnite कार 2020 मध्ये पहिल्यांदा भारतात लाँच केली होती. तेव्हापासून कंपनीने या कारच्या 1.50 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत. आता निसान मॅग्नाइट अनेक अपडेट्ससह बाजारात आणले आहे.

कार 13 रंगांमध्ये लाँच :

निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट आधुनिक आणि डायनॅमिक डिझाइनसह आणली गेली आहे. निसानच्या या कारमध्ये R16 डायमंड कट अलॉय व्हील वापरण्यात आले आहे. मॅग्नाइट फेसलिफ्टला नवीन रंगाचा सनराइज कॉपर ऑरेंज देण्यात आला आहे. ही SUV एकूण 13 रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये 8 मोनोटोन आणि 5 ड्युअल टोन कलर व्हेरियंटचा समावेश आहे.

निसानच्या या कारची खास गोष्ट म्हणजे यामध्ये क्लस्टर आयोनायझर बसवण्यात आले आहे. या उपकरणाच्या मदतीने वाहनाच्या आतील हवा स्वच्छ केली जाऊ शकते. यासोबतच हानिकारक बॅक्टेरियाही काढून टाकता येतात.

Nissan Magnite Facelift Launch l किंमत किती असणार? :

निसान मॅग्नाइटच्या अपडेटेड मॉडेलच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कार 1.0-लिटर टर्बो इंजिनसह उपलब्ध आहे. कंपनीच्या मते ही कार इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशनसह 20 kmpl चा मायलेज देईल आणि CVT सह ही कार 17.4 kmpl मायलेज देऊ शकते.

निसानने या कारमधील सेफ्टी फीचर्सकडे विशेष लक्ष दिले आहे. लॉन्चिंग इव्हेंटमध्ये, कंपनीने सांगितले की 55 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये वापरली गेली आहेत, ज्यामध्ये 6 एअरबॅग्ज देखील आहेत. यासोबतच वाहन डायनॅमिक कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम आणि हिल असिस्ट सिस्टीमची वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.

निसान मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. कंपनी या कारमध्ये 336 लीटर बूट स्पेस देत आहे. नवीन फीचर्स असूनही या कारच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. Nissan Magnite फेसलिफ्टची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

News Title – Nissan Magnite Facelift Launch

महत्त्वाच्या बातम्या-

छोटा पुढारी झळकणार ‘या’ चित्रपटामध्ये! ‘या’ बड्या नेत्याच्या बायोपिकमध्ये दिसणार

बोपदेव घाट गँगरेप प्रकरणी हादरवणारा खुलासा समोर; पीडितेला खुनाची धमकी दिली अन्…

खरेदीदारांना झटका! सोनं गेलं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राज्यातील विद्यार्थीनींच्या शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; किती रुपये मिळणार?

धक्कादायक! SBI ची बनावट शाखा उघडून ग्राहकांची लाखोंची फसवणूक