बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निता अंबानींकडून नीरज चोप्राचं अभिनंदन, तरीही सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

नवी दिल्ली | नीरज चोप्राने जागतिक अ‌ॅथलेटिक्स चँम्पियनशिपमध्ये रौप्य पदक (Silver Medal) जिंकले आहे. त्याने चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर लांब भाला फेकला. या भाल्याने त्याचे नाव रौप्य पदकावर कोरले गेले. दरम्यान, 24 वर्षीय नीरजने देशाचे नाव उंचाविले. त्याचे देशभरातून कौतुक केले जात आहे. यातच रिलायन्सनेही नीरज चोप्राला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी निता अंबानी यांच्या वतीने रिलायन्स फांऊडेशनने (Reliance Foundation) ट्विट करुन नीरज चोप्राचे अभिनंदन केलं आहे. यामध्ये त्यांनी रौप्यपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन दिलं. नीरज चोप्राचे जागतिक अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022 मधील शानदार विजयाबद्दल आणि खेळामध्ये भारतीय दलाने दाखवलेल्या आवेश आणि उत्कटतेबद्दल हार्दिक अभिनंदन, असा आशय लिहिला आहे. यामध्ये मात्र निता अंबानींनी एक चुक केली ज्यामुळे सध्या त्यांच्यावर टीका केली जात आहे.

नीरज चोप्रासाठी अभिनंदनपर ट्विट करताना नीरज चोप्राचा फोटो न लावता निता अंबानींचा(Nita Ambani) फोटो लावण्यात आला आहे. यावर अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत. यामुळे त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती आणि टीका होत आहे. श्रेयांश नावाच्या युजरने विचारलं आहे की नीरज चोप्राने आपलं लिंग (Gender) कधी बदललं ? एका युजरने टोमणे मारत लिहिलं आहे की, या फोटोत नीरज अगदीच वेगळा दिसत आहे.

दरम्यान, अभिनंदन जर नीरज चोप्राला देत आहे मग फोटो का निता अंबानींचा लावला आहे? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. अनेक युजर्सनी अगदी हस्यास्पद (ridiculous) कमेंट केली आहे.

थोडक्यात बातम्या

त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More