मुंबई | महाविकास आघाडी सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या नंतरही संपाचा तिढा सुटला नाही. अखेर संतप्त कर्मचारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चे घेवून गेले. मोर्चाद्वारे शरद पवारांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक झाली.
अशातच भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवारांना सल्ला दिला आहे. काय उपयोग 50 वर्ष राजकारण करून?, सामान्य लोक घरावर चप्पला आणि दगडं घेवून आले. आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ आहे, असं राणेंनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पवार साहेब आता तरी संन्यास घ्या आणि घरी बसा, असा सल्ला राणेंनी दिला आहे. नितेश राणेंनी अनेकदा शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. अशात आता एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश देखील मान्य करण्यास नकार दिल्यानं राज्यात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरावर मोर्चा घेऊन येणार आहेत याची जराही कल्पना मुंबई पोलिसांना का आली नाही?, असा सवाल आता राज्यात उपस्थित केला जात आहे.
थोडक्यात बातम्या –
“शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झालेत”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
“शरद पवारांनी 120 एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं”
“नरेंद्र मोदींनी ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे ‘गुजरात फाईल्स’ची प्रसिद्धी करावी”
ST कर्मचाऱ्यांचा पवार कुटुंबीयांना घेराव; सुप्रिया सुळेंची आंदोलकांना हात जोडून विनंती, म्हणाल्या…
ईडीच्या कारवाईवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.