Top News महाराष्ट्र मुंबई

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मुंबई |  पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आणि त्यामुळे महाविकास आघाडीत दिसून आलेल्या अमन्वयावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हे सरकार नाही तर सर्कस आहे अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!, असं ट्विट करत त्यांनी सरारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न सांगता 2 जुलै रोजी मुंबईमधल्या 10 पोलिस उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रविवारी गृह विभागाने तडकाफडकी रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गृह विभागाने या बदल्या रद्द केल्या, असं म्हटलं जात आहे.

रविवारी सुटी असताना मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी बदली रद्द करण्याचे आदेश जारी केले. त्यात त्यांनी 10 पोलिस उपायुक्तांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असं स्पष्ट केलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी!

कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या