मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…

मुंबई | अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना चांगलंच सुनावलं. तर तुमची संस्कृती असेल तर घरात या पण नीट या. दादागिरी करून याल तर मोडून काढू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चल दाखव. तुझे पोलीस हटव आणि दादागिरी करायला रस्त्यावर उतर. तुझ्या आजूबाजूची पोलीस 24 तास हटव. तुझ्या दोन्ही पोरांना घेऊन स्वत: खाली उतर. बंगल्यात बसू नको, असं आव्हान नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे स्टेरॉईड घेऊन बोलतात, असा घणाघात नितेश राणेंनी केला आहे. तर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शरद पवारांसमोर (Sharad Pawar) झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय, असा खोचक टोला देखील नितेश राणेंनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
“सोनिया गांधींसमोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय”
“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या”
दादागिरी करून याल तर ती मोडून काढू, दादागिरी कशी मोडायची हे…- उद्धव ठाकरे
“…म्हणून प्रशांत किशोर काॅंग्रेसमध्ये प्रवेश करता करता थांबले”
“माझं सरकार बरखास्त झाल्याचं समजलं त्यानंतर मी…”
Comments are closed.