दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंच्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!
मुंबई | भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात खुलास्यांचा सपाटा लावत खळबळ उडवून दिली होती. दिशाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नितेश राणेंना पोलिस चौकशीला देखील सामोरं जावं लागलं होते.त्यानंतरही नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणात नवा दावा केला आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवासेना पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले कनाल यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
8 जून आणि 13 जूनच्या रात्री कनालचं मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तपासला पाहिजे. यातून दिशा सालियन (Disha Salian Case) आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण (SSR Case) सोडवण्यात मदत होईल, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी ट्विट करत केला आहे.
दरम्यान, राहुल कनाल यांचा दिशा सालियन व सुशांत सिंहच्या राजपूतच्या मृत्यूशी संबंध असल्याचा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचा काही संबंध आहे का? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी देखील नितेश राणेंनी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
Mobile tower locations n CDR of Kanal on the 8th n 13th night will also help solving the Disha n SSR cases!!
Partners in crime ?— nitesh rane (@NiteshNRane) March 8, 2022
थोडक्यात बातम्या-
“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”
अजित पवारांना झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा
‘महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज’; संजय राऊत म्हणाले…
“…तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली”
Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट
Comments are closed.