‘ही तर सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅग…’;नितेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा’
मुंबई | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सुरू केलेल्या ‘शेतकरी आठवडे बाजार’ या उपक्रमाला महानगरपालिकेकडून अडथळा आणला जातोय असा आरोप खुद्द लाड यांनी केला होता. या प्रकरणी भाजपकडून लाड आणि आमदार नितेश राणे यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. परळीत पब सुरू आहेत, बांद्र्यामध्ये बार सुरू आहेत मात्र यांना शेतकरी आठवडे बाजाराचा बंद पाडायचाय, अशा शब्दात राणे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
राणे म्हणाले की, लाॅकडाऊनचे नियम पायमल्ली तुडवत दिशा पटनी यांची शूटिंग चालूच आहे. मात्र त्रास केवळ सामान्य जनतेला दिला जात आहे. दिशा पटनी, डिनो मारीया यांना सरकारचे नियम पायदळी तुडवण्याचे अधिकार असून ही सर्व बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅग आहे.
राज्यात दोन प्रकारचे न्याय असून शेतकरी वर्गासाठी वेगळा तर पब अन् बारसाठी वेगळा. म्हणजेच मुंबईच्या नाईटलाईफचं कौतुक करायचं आणि शेतकऱ्याला त्रास द्यायचा असा सर्व प्रकार असल्याचं राणे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. तसेच आठवडी बाजार बंद करण्याचा महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून प्रयत्न केला गेला, तर येणारा काळ हा महाविकास आघाडीसाठी संघर्षाचा असेल, असा इशाराही लाड यांनी दिला दिला आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळानं शेतकऱ्याला आपला शेतमाल बाजारात विकता यावा, यासाठी सर्वप्रथम पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडे बाजाराचा प्रयोग सुरू केला होता. मुंबईतही असाच प्रयोग सुरू करण्यासाठी लाड उत्सुक होते. मात्र महानगरपालिकेकडून त्यांच्या या कामात आडकाठी आणली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य- नवाब मलिक
‘राज ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, पोलिसात तक्रार दाखल
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र
मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’
काय सांगता! खेकडा चक्क सिगरेट ओढतोय; ‘हा’ व्हिडीओ पाहून सारं जग झालंय थक्क
Comments are closed.