मुंबई | शिवसेना पक्षफूटीपासून भाजप आणि त्यात खास करुन राणे कुटुंबीय शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्याची आणि त्यांची छेड काढण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मुलाखत दिली आहे. ती मुलाखत येत्या 26 आणि 27 तारखांना प्रकाशित करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. या मुलाखतीवरुन आता नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मुळात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का? शिवसेना त्यांची राहिली आहे का?, अशी त्यांनी विचारणा केली.
तसेच या मुलाखतीवर बोलताना राणे म्हणाले, संजय राऊत बेकार (बेरोजगार) आहेत आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात म्हणून त्यांनी फावल्या वेळात मुलाखत घेतली, असे राणे म्हणाले. तसेच खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहे. त्यामुळे आता उरल्या सुरल्यांचे काय ऐकायचे?, असा खोचक टोला त्यांनी यावेळी राऊत आणि ठाकरेंना लगावला.
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्यावर देखील राणे घसरले. अडीच वर्षात महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. ही गद्दारी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या नाईट लाईफमुळे झाली. जेव्हा शिवसेनेला आणि सैनिकांना त्यांची गरज होती, तेव्हा ते दिनो मोरियाबरोबर बसायचे. आता यात्रा काढून काही उपयोग नाही, असे म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली.
मी: साहेब,फुटीर गटाची तुम्हाला एक विनंती आहे.
उद्धवजी: बोला..मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो..
खळबळ जनक मुलाखत.
सामना: 26 आणि 27 जुलै@mieknathshinde @BJP4Mumbai pic.twitter.com/E3zZCY9VZ6— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
थोडक्यात बातम्या –
पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद
‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!
“शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश”
नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…
Comments are closed.