बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोलिसांच्या गराड्यातून बाहेर निघून दाखवा, मग तुम्हाला…”, राऊतांना खुलं आव्हान

मुंबई | मागील दोन दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊतांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर नितेश राणेंनी टीकेची झोड उठवली आहे. ‘संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना स्वत:चा गुरू म्हणवून घेऊ नये. संजय राऊत सध्या ज्या प्रकारची वक्तव्य करत आहेत ते पाहता त्यांच्या जिभेवर संशोधन करावे,’ अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.

‘संजय राऊत यांच्या जीभेला हाड असेल आणि त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल तर एकदा त्यांनी स्वत:च्या भोवतालच्या पोलीसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावं. मग जीभ कशी चालवायची हे भाजपचे कार्यकर्ते त्यांना बरोबर इंगा दाखवतील, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या आक्षेपार्ह टीप्पणीनंतर भाजप नेते आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप विरूद्द संजय राऊत (Sanjay Raut) वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका नाहीतर…”, किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More