औरंगाबाद महाराष्ट्र

संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे

औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवरील आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागं घेतले जात नाहीत मात्र संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?, असा सवाल आमदार नितेश राणेंनी विचारला आहे. ते लासूर येथील मराठा समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते.

संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागं घेतले जातात पण मराठा युवकांवरील गुन्हे तसेच आहेत, याचा मराठा समाजानं विचार केला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते अखिल मराठा समाजाच्यावतीनं ‘स्फूर्ती नायक’ पुरस्कार देऊन नितेश राणेंचा गौरव करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या-

हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे

ज्याच्या हाती चहाचा उष्टा कप द्यायचा त्याच्या हाती देश दिला; दिल्लीत पोस्टरबाजी

-“मुख्यंमत्री मला भावासारखे; पण भावानं लाथ मारल्यावर दुसरं घर शोधायला लागणार”

चंद्राबाबू नायडूंच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; संजय राऊत चंद्राबाबूंना भेटले

“काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी जमिनीवर राहून काम करणाऱ्या नेत्यांना बळ द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या