बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

मुंबई | मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झालेली दिसत आहे. अशातच यावर विरोधी पक्ष भाजपमधील नेत्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी यावरूव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं जाहीरपणे घेतली आहेत.

आता कळलं, ठाकरे सरकारमधील काही मंत्री गुलाबराव आणि नवाब भाईसारखे येड्या सारखं का बडबड करत असतात. झिंगझींग झिंगाट मंत्रालयातच चालू असेल तर मग हे शुद्धीत कसे असणार, अशा शब्दात नितेश राणे यांनी टीका केली आहे. टीका करताना नितेश राणेंनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव घेतलं आहे.

मंत्रालयात प्रवेश करताना सामान्य माणसांना सहजासहजी प्रवेश दिला जात नाही. मात्र मंत्रालयाच दारूच्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही यावरून टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना आज समोर आली असल्याचं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे. यावर सरकारमधील नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More