बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचं हिंदुत्व जर चोर बाजार असेल तर शिवसेनेचं हिंदुत्व भेंडी बाजार आहे”

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भाजपचे हिंदुत्व एकप्रकारचे चोरबाजार असल्याचे वारंवार उघड झाले आहे, अशी टीका सामनातून (Saamana) करण्यात आली होती.

सामनातून केलेल्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपचं (BJP) हिंदुत्व जर चोर बाजार असेल तर शिवसेनेचं (Shivsena) हिंदुत्व भेंडी बाजार आहे’, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

‘हिंदुत्वाबाबत भाजपला बोलणाऱ्या शिवसेनेमध्ये हिंमत आहे का? शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासमोर हिंदुत्वाबद्दल बोलायची शिवसेनेची हिंमत आहे का?’, अशी खोचक टीका देखील नितेश राणेंनी केली आहे.

दरम्यान,’भाजपने राम मंदीराच्या नावाखाली मलिदा लाटण्याचे काम केले. भाजपला राम मंदीराच्या बाजूच्या जमिनी खिशात घालायच्या आहेत’, असा घणाघात देखील सामनातून करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“2014 ला नरेंद्र मोदी हे उगाच निवडून आले नाहीत, भाजप हा…..”

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणाचा तपास स्थगित; ‘हे’ कारण आलं समोर

‘नितेश राणेंनी माफी मागावी’; राणेंच्या ‘त्या’ ट्विटनं शिवसैनिक आक्रमक

Omicronबाबत केलेल्या अभ्यासातून ‘ही’ दिलासादायक माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले…

‘सात समंदर पार’ गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More