महाराष्ट्र मुंबई

“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

Nitesh Rane
नितेश राणे

मुंबई | असंख्य नवऱ्यांना वाटत असेल शिवसेनेसारखी बायको पाहिजे. आपली लफडी कळली तरी आपल्याला सोडत नाही, अशी मिश्किल टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

आपली लफडी कळल्यावर शिवसेनेसारखी बायको असेल तर जास्तीत जास्त काय? सामनामधून एखादा लेख लिहून येऊ शकतो, पण तुमचा संसार सुरू राहू शकतो; अशी मिश्किल टिप्पणी नितेश राणे यांनी केली आहे.

आपल्या ट्वीटर अकांऊटवरून नितेश राणे यांनी शिवसेनेची चांगलीच खिल्ली उडवली आहे. राणे-शिवसेना वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर करताचं नारायण राणेंवर शिवसेनेनं टीका केली होती. त्याला नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

-“महाराष्ट्रात ब्राह्मणवादी लावतायत मराठा-दलितांमध्ये भांडणं”

-“काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना दुसरा पर्याय नाही”

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या