बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणे नावाने शिवसेना घाबरते, पुन्हा समोर आल्यास जोरदार उत्तर द्या”

मुंबई | शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र दिसून आलं. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलीय. तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यानंतर भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. अशात भाजपने पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजींदर तीवाना, दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप, दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष अजित सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन भिलारे, मुंबई कमिटी सदस्य रोहन देसाई यांच्यासाहित 40 कार्यकर्त्यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नितेश राणेंनी शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.

दरम्यान, राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना विश्वास दिलाय.

थोडक्यात बातम्या- 

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर

30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

‘भाजपचं ओळखपत्रं दाखवा अन् मोफत पेट्रोल मिळवा’; शिवसेनेची खास ऑफर

“…तर हर हर महादेवचा गजर करत जिथल्या तिथे हिशेब चुकता करु”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More