महाराष्ट्र

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून आई आणि मुलाचं सरकार हटवलं. त्याचप्रमाणे आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचे आहे, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

उद्धव ठाकरे आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा करत होते. पण कोरोनाच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली तरी ते घरातच बसून राहिले, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय.

भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी बोरिवली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश राणे बोलत होते.

कोरोनाच्या काळात पालिकेने केवळ मोठमोठ्या रक्कमेची टेंडर मंजूर करवून घेतली. यानंतर प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार झाले पाहिजे, असं नितेश राणे यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या-

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

‘या’ अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सामील झालो- एकनाथ खडसे

पंकजा मुंडे संपल्या असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी- पंकजा मुंडे

ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगणाचं संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाली…

मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार- संजय राऊत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या