बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली फक्त”

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने काल अंतिम सुनावणी केली. न्यायालयाच्या सुनावणीनंतर मराठा आरक्षण अवैध असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. या सर्व प्रकरणात मराठा समाज मोठ्या प्रमाणात सरकारचा निषेध करताना पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

काल जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. यासंबंधी नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हद्वारे केलेल्या संवादावर भाष्य करताना आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

“आदू… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त…” अशा आशयाचं ट्विट करत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. दरम्यान, मुख्यमंत्री यांनी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हात जोडून विनंती केली होती की, “मराठा आरक्षण आता आपला अधिकार आहे. त्यामुळे काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली, तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहायची आहे”.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक टीकाटिप्पणीला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आरक्षणावरून काल दुपारीच नितेश राणे यांनी ट्विट करत आदित्य किंवा तेजस यांचे अधिकार कोणी हिसकावून घेतले असते आणि त्यांचं भविष्य अंधारात टाकलं असतं तर मराठा आरक्षण नक्कीच टिकवला असतं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेसह आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या –

एकाच तरुणीवर दोन गुंडांचं जडलं प्रेम, तरुणीने नकार दिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

“370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाबाबत दाखवा”

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की…- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More