बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”

मुंबई | ठाकरे आणि राणे हा वाद काही महाराष्ट्रासाठी नवा नाही. त्यातच आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारवर खोचक टीका केली आहे. नितेश राणेंच्या ट्विटमुळे ठाकरे विरुद्ध राणे असा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत ‘बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा’, असा टोला आदित्य ठाकरे आणि आघाडी सरकारला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच नितेश राणेंनी केलेल्या ट्विटचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.

नितेश राणे आपल्या रोखठोक बोलण्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्यातच त्यांनी पेंग्वीनची स्काॅटलॅंडवारी,उपाशीपोटी शेतकरी, कामकरी असं लिहून एक व्यंगचित्रही पोस्ट केलं आहे. दरम्यान, ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहे. तसेच नितेश राणेँनी महाविकास आघाडीला चिमटा काढल्याचं या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

नितेश राणेंनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकवेळा ठाकरे सरकारवर टीकेची झो़ड उठवली होती. तसेच आताही केलेल्या ट्विटमुळे आणि ठाकरेंना काढलेल्या चिमट्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

 

थोडक्यात बातम्या

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

वायु प्रदुषणाच्या समस्येवरून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! संरक्षण सचिव, गृहसचिव आणि आयबी प्रमुखांच्या कार्यकाळातही बदल

सकाळी-सकाळी नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटने उडाली एकच खळबळ

एनसीबीची मोठी कारवाई! 1127 किलो गांजा ‘या’ ठिकाणाहून केला जप्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More