बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या, आश्चर्य वाटतं की त्यांनी कपडे का नाही फाडून घेतले”

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी काल केली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. 

“भास्कर जाधव हे काय चीज आहे, हे कोकणातील सगळ्या लोकांना माहिती आहे. आमच्या कोकणात दशावतार असतात. त्यामधला नरकासुर म्हणजेच भास्कर जाधव आहेत. तसेच तमाशातील सोंगाड्या क्रमाने भास्कर जाधव वेगवेगळे संघ घेत असतात”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, भास्कर जाधव यांच्यासारख्या सोंगाड्या माणसाने त्या तालिका अध्यक्षच्या खुर्चीचा अपमान केला आहे, असं देखील यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच ‘मला आश्चर्य वाटतं की, ते काल रडले का नाहीत? किंवा त्यांनी कपडे फाडून घेतले नाहीत’, असं म्हणत नितेश राणे यांनी भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे.

कोकणी माणूस भास्कर जाधवांना चांगलच ओळखतो, ते नेहमीच सोंगाड्यासारखं आणि नरकासुरासारखं सोंग घेत असतात. त्यामुळे काल ते रडले का नाही या गोष्टीचं माझ्या सारख्या कोकणी माणसाला आश्चर्य वाटतं असं नितेश राणे म्हटले आहेत. आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तर आज नेमका कोणत्या मुद्यांवर चर्चा रंगणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More