बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बांगलादेशाप्रमाणेच मुंबईतही हिंदू असुरक्षित; मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार”

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यामुळे राणे-ठाकरे वादाच्या समीकरणात आणखी भर पडल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील हिंदू हे बांगलादेशाप्रमाणेच असुरक्षित असल्याचं विधान आमदार नितेश राणे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईत हिंदू असुरक्षित असून मालवणी भागातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी भेट देऊन सर्व हिंदूंना हिंमत देणार असल्याचं आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. नितेश राणेंच्या विधानामुळे अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात बंगाल पॅटर्न राबवणार असल्याचं म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश येत्या काही दिवसात करणार असल्याचंही नितेश राणे यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे या प्रकऱणात नितेश राणे या स्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

दरम्यान, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूची घरं जाळण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आमदार नितेश राणेंनी मुंबईतील हिंदू असुरक्षित असल्याचं वक्तव्य केल्याने यावर सरकारकडून काय प्रतिक्रीया मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘ब्लू फिल्म्स पाहणाऱ्या RSS कडून शिकण्यासारखं काहीच नाही’; ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More