बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता आत्मविश्वासाने सांगतो आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी अगदी स्पष्टपणे दिसत आहेत”

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्र सरकारवर शरसंधान साधलं. तसेच काल सकाळपासूनच मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत भाषणामधून हल्लाबोल चढवला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी आता त्यांच्या भाषणावर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची निंदा करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत “दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर मी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हणू शकतो की, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी अगदी स्पष्टपणे दिसतात, कोणतीही शंका नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याला भाजप कडून नेमकं कसं प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावलं तर…’, उद्धव ठाकरेंना ‘या’ नेत्याचा इशारा

चेन्नईच सुपर ‘किंग’! चौथ्यांदा पटकावला आयपीएलचा किताब

“बाबरी मस्जिद पाडण्यासाठी एक तरी शिवसैनिक होता का?”

2021 आयपीएलचा अंतिम सामना खेळत धोनीने केलाय हा भीम पराक्रम, जाणून घ्या!

फक्त 2 धावांनी हुकली चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची ऑरेंज कॅप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More