Top News

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

Photo Credit- Nitesh Rane/facebook And Udhhav Thackeray/twitter

मुंबई | बी़ड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून संबंधित मंत्र्याच्या राजीनाम्यासह अटकेची मागणी भाजपने केली आहे.

भाजप नेत्या आणि महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.  यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती संबंधित मंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

याबाबत विराध व्यक्त करताना नितेश राणे यांनी एक ट्विट करत शिवसेनेला खडेबोल सुनावले आहेत. पूजा चव्हाण बद्दल आवाज उचल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मला ही टाका ना.. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे.. वाट बघतो आहे !!!, असं संजय राठोड म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘अशा’ लोकांवर जबरदस्त दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकला सुप्रिम कोर्टाचा धक्का

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या